सर आयझॅक न्यूटन
(1642-1727) आधुनिक काळातील अग्रगण्यशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या ‘Principia’ नामक पुस्तकात मांडला. त्याआधी केप्लरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम मांडले होते. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काहीच जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले.
      न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅलक्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बिण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते.
        Great Scientists: Sir Isaac Newton (1642-1727) was one of the greatest scientists of recent times. He was born in England. He gave his laws of motion, equations of motion and theory of gravity in his book Principia. Before this book was written, Kepler had given three laws describing planetary motions. However, the reason why planets move in the way described by Kepler’s laws was not known. Newton, with his theory of gravity, mathematically derived Kepler’s laws.
    In addition to this, Newton did ground breaking work in several areas including light, heat, sound and mathematics. He invented a new branch of mathematics. This is called calculus and has wide ranging applications in physics and mathematics.He was the first scientist to construct a reflecting telescope.

योहानेस केप्लर (1571- 1630) एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. सन 1600 मध्येते प्राग मधील टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले. सन 1601 मध्ये टायको ब्राहे यांच्या आकस्मिक मृत्यू नंतर केप्लर यांना त्यांचा उत्तराधिकारी (शाही गणितज्ञ) म्हणून नियुक्त करण्यात आले. ब्राहे यांनी केलेली ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे वापरून केप्लर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले. त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली. त्यांचे कार्य पुढे न्यूटन 00
यांना गुरूत्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधात उपयोगी पडले.
   Johannes Kepler (1571-1630) was a German astronomer and mathematician. He started working as a helper to the famous astronomer Tycho Brahe in Prague in 1600. After the sudden death of Brahe in 1601, Kepler was appointed as the Royal mathematician in his place. Kepler used the observations of planetary positions made by Brahe to discover the laws of planetary motion. He wrote several books. His work was later used by Newton in postulating his law of gravitation.


टिप्पण्या

  1. घरातील किंवा शेजारील ज्येष्ठ लोकांशी बोलून तुमच्या समुदायातील स्थानिक परंपरांचा अभ्यास करा त्यातील पर्यावरण संरक्षणाला अनुकूल असलेल्या प्रथा अधोरेखित करा

    उत्तर द्याहटवा
  2. घरातील किंवा शेजारील ज्येष्ठ लोकांशी बोलून तुमच्या समुदायातील स्थानिक परंपरांचा अभ्यास करा त्यातील पर्यावरण संरक्षणाला अनुकूल असलेल्या प्रथा अधोरेखित करा

    उत्तर द्याहटवा
  3. घरातील किंवा शेजारील ज्येष्ठ लोकांशी बोलून तुमच्या समुदायातील स्थानिक परंपरांचा अभ्यास करा त्यातील पर्यावरण संरक्षणाला अनुकूल असलेल्या प्रथा अधोरेखित करा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट